मातेचे दर्शन हे पूर्व पुण्याईचा भाग - श्री हेमंत जोशी , पुणे
|
_ ॥
श्री खम्बांबा माता
की जय ॥
सर्वप्रथम ही वेबसाईट डिझाइन केल्याबद्दल विश्वस्त मंडळ व वैद्य मनिष जोशी यांचे अभिनंदन. या साईट मुळे सर्व भक्तगण संवाद साधु शकतील. श्री खम्बांबा माता आमची कुलदेवता. हिंगणी मी सर्व प्रथम सुमारे १४-१५ वर्षापुर्वी ( मी महाविद्दयालयात होतो तेव्हा ) पाहिले. त्या वेळेस मातेचे मंदीर लहान आणि समोर छोटीशी ओसरी असे स्वरुप होते.त्या प्रथम दर्शनातच धन्य झाल्याचा अनुभव आला. २००१ साली मंदीराचा जीर्णोद्धार झाला आणि नंतर शाकंबरी पोर्णिमेचा उत्सवही सुरु झाला. गेली ३ ते ४ वर्षापासुन दरवर्षी मातेच्या दर्शनाचा सुवर्णयोग जुळुन येत आहे. श्री खम्बांबा मातेचे दर्शन घेणे हा एक पुर्व पुण्याईचाच भाग म्हणावा लागेल.अतिशय तेजस्वी आणि जागॄत अशा मुर्तीचे दर्शन घेतल्यावर कॄतकॄत्य होते. माझा अनुभव आहे की खम्बांबा मातेच्या नुसत्या स्मरणाने माता संकटातून मुक्त करते. माझ्या ऑफिस मधे अन्वयाने देखील संबंध नसतांना अतिशय मोठे संकट येण्याची चाहूल लागली होती आणि माझ्या सारख्या पापभिरु माणसाला भीतीच वाटावी. आतिशय मनोभावे मी देव घरातील श्री खम्बांबा मातेच्या फोटो समोर प्रार्थना केली आणि या संकटातुन विनासायास सोडविण्यासाठी साकडे घातले. मातेची कॄपा झाली आणि अतिशय अलगद पणे ते संकट निघुन गेले. श्री खम्बांबा माता फक्त प्रापंचिकच नव्हे तर पारमार्थिक उन्नती साठीही कॄपा प्रदान करते हा माझा अनुभव आहे. खम्बांबामातेचे देव्याष्टक पठण केल्याने मानसिक सामर्थ्यात प्रगती झाल्याची अनुभुती येते. अशी ही श्री खम्बांबा माता आम्हां भक्तांना कायम भक्ति सेवेसाठी प्रेरणा देत राहो, हीच मातेच्ररणी प्रार्थना. श्री. हेमंत मनोहर जोशी, सिंहगड रोड, पुणे मोबा. - ९८८११२००८५ |