_
खंबांबा देवीचा सुखद अनुभव - सौ. विद्या भोंगे
खंबांबा देवीचा सुखद अनुभव - सौ. विद्या भोंगे
|
_मुलीच्या लग्नाच्या वेळीचा हा
अनुभव आहे.
मुलीसाठी आम्ही वरसंशोधनास सुरुवात केली. साधारण वर्षभर काही जाणवले नाही. पण वर्षभरानंतर मात्र आम्हाला थोडी काळजी वाटायला लागली. म्हणुन आम्ही सह कुटुंब खंबांबा मातेच्या दर्शनास आलो. तिला मुलीच्या लग्नाचे जमावे मणुन साकडे घातले कि “लवकरात लवकर मुलीचा विवाह होऊ दे व चांगले स्थळ मिळू दे. आम्ही तुझी यथासांग पूजा करू.“ मातेचे दर्शन घेऊन आम्ही परत निघत असतांना गावातील एक स्त्री देवीच्या दर्शनास आली. तिने माझ्या मुलीकडे पेन मागितला. माझ्या मुलीने तिला पेन दिला व सोबत तिला नमस्कारही केला. त्या स्त्रीने माझ्या मुलीला “लवकर लग्न होऊ दे” असा आशिर्वाद दिला. खरंतर आमचे त्या स्त्रीशी याविषयी काहीही संभाषण झालेले नव्हते. परंतु तिने स्वतःहून असा आशिर्वाद दिला. आणि आश्चर्य म्हणजे खरोखर दोन महिन्यात माझ्या मुलीचे लग्न ठरले. तिला हवे तसे स्थळही मिळाले. मातेच्या कृपेने आज ते आनंदात संसार करीत आहेत. तिच्या सासरकडील मंडळींनी देखिल समाधानाचे बोल बोलून दाखविलेले आहेत. खंबांबा ही महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वतीचेच रूप आहे. आमच्या घरी भाद्रपदात तीन दिवस देवीचा उत्सव असतो. त्या उत्सवात माझ्या मुलीने लहानपणापासून मातेची सेवा केली त्याचे चांगले फळ तिला देवीने दिले हेच खरे ! तिच्या सासरीही देवीचा उत्सव साजरा केला जातो. मातेच्या कृपेने तिला एक गोंडस कन्यारत्नही प्राप्त झालेले आहे. ही सगळी चांगली फळे केवळ आणि केवळ मातेच्या आशिर्वादानेच प्राप्त झाली अशी माझी दृढ भावना आहे. पुढेही अशीच कृपा आम्हांवर मातेने ठेवावी हीच मातेचरणी मनापासून प्रार्थना !!! सौ. विद्या प्रदिप भोंगे २६, शाहू नगर, देवपुर, धुळे. फोन - ९८२२६५८७११ |